जिंदगी जिने के लिये होती है रोने के लिये नही ! हे वाक्य मी नेहमी सगळ्यांना सांगायचो पण माझ कुठ तरी चुकत गेल आणि मीच स्वतः रडायला लागलो . एक सर्वसाधरण घरातून ३ हजार रु महिना कमविणारा ४ महिन्यानंतर १ छोटासा bussinesman झालो होतो , गेली २ वर्ष bussiness ठीक ठाक होता . पण त्यात एक वाईट व्यसन लागून गेली ती म्हणजे मैत्रीची आणि त्यात पार्टी ची पार्टी म्हणजे बीर पिणे पण मला काही वाटत नव्हते , ते म्हणतात लोक सत्य आहे देव देऊन बघतो ते सत्य आहे .माझी पण गत तीच झाली. अंधळा पीठ दळतो अन कुत्रा खात जातो . तसेच मला कुटूनतरी देवाची साथ होती , पण माझ दुर्लक्ष त्याकडे गेल आणि कर्जात बुडत गेलो , इतका गेलो कि वर येन अवघड झालाय . जे काही मित्र होती दूर निघून गेली , सर्वच काही ऐकून होत " जो पर्यंत पैसा असतो , तो पर्यंत मित्र असतात"आजोबा नेहमी सांगायचे . पण माझ तिथ दुर्लक्ष झाल . सगळी कडे मदत मागून पहिलो कुणी साथ देत नव्हत , कुणी फोन सुद्धा उचलत नव्हत . म्हणजे माणूस इतक्या वाईट परिस्थितून कसा जातो ते मला कळत होत . घरून सुद्धा काही मिळत नव्हत कारण घरच्या माणसाचं सुद्धा माझ्यावरून विश्वास उडून गेला होता . मग सारखे विचार यायचे कि माझे कसे होणार अधून मधून भगवान श्रीकृष्ण आठवायचे " जो हुआ अच्छा हुआ , जो हो रहा है अच्छा हो रहा रहा है !जो होगा वह भी अच्छा होगा !तुम्हारा क्या गया , जो तुम रोते हो ?.....................................
चू